T20 WorldCup 2022 – टी-२० विश्वचषकातील २९ वा सामना भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात पार्थ येथील क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. सामान्यांच्या सुरुवातीला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर फलंदाजीच्या दृष्टीने भारतीय संघात काही बदलही करण्यात आले आहेत. भारतीय संघाच्या तुलनेत आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी थोडी वरचढ वाटत आहे.
आजच्या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाला संघात स्थान देण्यात आले आहे. या बदलामुळे भारतीय संघाची फलंदाजी आणखी मजबूत भासत आहे. याव्यतिरिक्त या सामन्यात संघाचा सलामीचा फलंदाज केएल राहूलच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा असणार आहे. त्याने मागील दोन सामन्यांमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली आहे. त्यानंतर राहुलच्या जागी ऋषभ पंतला खेळवा अशी मागणी होत होती. मात्र राहुलला संघात कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज खासकरून राहुलवर चांगली कामगिरी करण्याची जबादारी असणार आहे.
🚨 Toss & Team News from Perth 🚨@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bat against South Africa. #T20WorldCup | #INDvSA
Follow the match ▶️ https://t.co/KBtNIjPFZ6
1⃣ change to our Playing XI as @HoodaOnFire is named in the team 🔽 pic.twitter.com/X9n5kLoYNn
— BCCI (@BCCI) October 30, 2022
दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हन
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
साऊथ आफ्रिका संघ – टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, अॅनरिक नॉरकीय.