T20 WorldCup – टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ सामान्यनासाठी अ आणि ब असे दोन गट करण्यात आले होते. अ गटातील खेळले गेले असून त्या गटातील सेमीफायनासाठीचे न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन संघ पात्र ठरले आहेत. तर दुसरीकडे ब गटातील प्रत्येक संघाला उद्या होणार आणखी एक-एक सामना खेळायचा आहेत. त्यामुळे अजूनही ब गटातील कोणताही संघ सेमीफायनालासाठी पात्र ठरलेला नाही. उद्याच्या सामन्यांमध्ये कोणताही अपसेट न झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनालासाठी पात्र ठरतील हे नक्की आहे.
“पुढच्या आठवड्यात मोठा केक कापायचाय”, विराटच्या याच शब्दांनी जिंकली लाखो चाहत्यांची मने!
आजच्या श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडचा ४ गडी राखून विजय झाला. महत्वाचं म्हणजे इंग्लंडच्या या विजयामुळे गतविजेत्या कांगारूंना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. कारण ऑस्ट्रलियाचा नेट रनरेट खराब असल्याने त्यांना तिसऱ्या स्थानावर जावे लागले. तर इंग्लंड संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सलग पाचव्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आता उद्याच्या सामन्यात भारताने झिंबाब्वेविरुद्ध बाजी मारल्यास सेमीफायनामध्ये इंग्लंड-भारत अशी लढत पाहायला मिळणार आहे.
इंग्लंड-श्रीलंका यांच्यातील सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पथुम निसांकाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने २० षटकांत ८ बाद १४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने १९.४ षटकांत ६ बाद १४४ धावा करत सामना जिंकला.
View this post on Instagram
रविवारी ब गटातील दक्षिण आफ्रिका-नेदरलँड, भारत-झिंबाब्वे आणि पाकिस्तान-बांगलादेश असे सामने खेळवले जाणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी विजय मिळवल्यास गुणतालिकेत भारत ८ अंक आणि दक्षिण आफ्रिका ७ अंकांसह सेमीफायनालासाठी पात्र ठरतील. त्यामुळे अ गट आणि ब गट मिळून सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आणि भारत-इंग्लंड असे सामने होणार आहेत. भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल सामना झाल्यास तो १० नोव्हेंबरला एडिलेडवर दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होईल. तर न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमीफायनल लढत झाल्यास ती ९ नोव्हेंबरला सिडनीवर होईल.