T20 WorldCup – टी-२० विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी खेळवला जाणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सामन्याचे थेट प्रक्षेपण १.३० वाजता सुरु होईल. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची सुरुवात त्यांत खराब झाली होती. आगोदर भारत आणि नंतर त्यांना झिम्बाब्वेने पराभवाचा धक्का दिला होता. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाने सुपर-१२ सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. न्यूझीलंड संघाने त्यांच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
“इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये कार्तिकला न खेळवता पंतलाच खेळवा”, रवी शास्त्रींचा सल्ला!
स्पर्धेतील ( T20 WorldCup ) सलग दोन सामने हरल्यानंतर पाकिस्तान संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडलायचे मानले जात होते, मात्र आफ्रिकेसोबत नेदरलँड्सने केलेला मोठा उलटफेर पाकिस्तानसाठी जीवनदान ठरला. कारण आफ्रिकेचा नेदरलँड्सने पराभव केल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशला हरवत सहज सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर न्यूझीलंड संघाने अ गटाच्या गुणतालिकेत ७ अंकांसह पहिले स्थान मिळवले होते.
उद्या होणाऱ्या सेमीफायनलसाठी सुपर-१२ मधील दोन्ही संघांची कामगिरी पाहता न्यूझीलंड संघाचे पारडे जड भासत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानची जोडी म्हणजे कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना अद्यापही मोठी खेळी करता आलेली नाही. त्यांच्या फलंदाजीतील अपयश संघासाठी महत्वाच्या सामन्यात डोकेदुखी ठरू शकते. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने मागील सामन्यात दमदार खेळी केली होती. त्यामुळे आता न्यूझीलंड संघ फलंदाजीतही मजबूत झाला आहे.
दोन्ही संघाच्या गोलंदाजीत फारसे साम्य पाहायला मिळते. दोन्ही संघाकडे वेगवान गतीने मारा करणारे गोलंदाज आहेत. त्यामुळे उद्याचा सेमीफायनल सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील. जो संघ हा सेमीफायनल सामना जिंकेल तो थेट ( T20 WorldCup )फायनल सामन्यात प्रवेश करेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनल सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर किंवा हॉटस्टारवर पाहता येईल. याशिवाय सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स तुम्ही दैनिक प्रभात वेबसाइटवर वाचू शकता.