T20 WorldCup – टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ मधील शेवटचा सामना रविवारी भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अगोदर केएल राहुल आणि शेवटी सूर्यकुमार यादवच्या तडाखेबाज अर्धशतकीय खेळीने भारताने २० षटकांत १८६ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ ११५ धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना ७१ धावांनी खिशात घातला.
“जगात डिव्हिलियर्स एकच, मी तर त्याच्यासारखा प्रयत्न करतोय”, सूर्यकुमार यादवचं वक्तव्य
टी-२० विश्वचषकातील ( T20 WorldCup ) सेमीफायनल सामान्यांच चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे ९ नोव्हेंबरला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होईल. तर १० नोव्हेंबरला भारत आणि इंग्लंड आमने-सामने असणार आहेत. टीम इंडियाची कामगिरी पाहता संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतीय संघातील फलंदाज व गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. टीम इंडियाचा धाकड फलंदाज सूर्यकुमार यादव गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आहे. त्याच्या बॅटने यंदाच्या वर्षात भरपूर धावा ठोकल्या आहेत.
झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सूर्यकुमार रोहितच्या नेतृत्वाबद्दल म्हणाला की, “मी कशी फलंदाजी करावी याबाबत रोहितने मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेले आहे. प्रत्येक सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी मी माझे मन शांत ठेवतो. रोहित आणि मी आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळतो त्यामुळे आम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतो. माझ्याकडे काही नवीन कल्पना असतील तर मी कोणत्याही अडचणीशिवाय रोहितला सांगू शकतो. मैदानावर शांत राहून रोहित त्याच्या नियोजनानुसार चांगले काम करतो.”
For his breathtaking batting pyrotechnics, @surya_14kumar bagged the Player of the Match award as #TeamIndia beat Zimbabwe by 7⃣1⃣ runs at the MCG👏 👏
Scorecard 👉 https://t.co/shiBY8Kmge #T20WorldCup | #INDvZIM pic.twitter.com/k236XjavDv
— BCCI (@BCCI) November 6, 2022
दरम्यान, झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने २५ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६१ धावा ठोकल्या. त्याच्या फलंदाजीच्या शैलीची तुलना दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सशी केली जात आहे. डिव्हिलियर्सप्रमाणे सूर्यकुमारही फलंदाजीला आल्यावर मैदानाच्या कोणत्याही भागात फटका खेळण्यास सक्षम आहे. त्याचे उत्तम उदाहरण आजच्या सामन्यातही पाहावयास मिळाले.