भोपाळ – जबलपूरमधील सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये भारतीय लष्कराच्या डेअर डेव्हिल्स संघाने नवीन वर्ल्ड रेकाॅर्ड केलाय. कॅप्टन दिशांत कटारिया यांनी 65 लोकांवरून बाईक उडवून जुन्या संघाचा विक्रम मोडला आहे. कॅप्टन कटारिया यांनी बाईकवरून 60.4 फूट लांब उडी घेतली. यापूर्वी 2013 मध्ये डेअर डेव्हिल्सच्या संघाने 44.10 फूट उडीचा विक्रम नोंदवला होता.
डेअर डेव्हिल्स टीमचे कॅप्टन दिशांत कटारिया यांनी मंगळवारी 65 लोकांवरून बाईक उडवून सर्वांना आश्चर्यचकित केलं. या जंपमध्ये त्यांची बाईक 60.4 फूटापर्यंत हवेत होती.
या कामगिरीनंतर कॅप्टन कटारिया यांच्या नावावर नवीन वर्ल्ड रेकाॅर्ड नोंदविण्यात आला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डसह लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये या कामगिरीची नोंद करण्यात आली आहे.
यापूर्वी 2013 मध्ये डेअर डेव्हिल्स कॅप्टन मेजर अभयजीत मेहलावत यांनी 51 लोकांवरून बाईकवरून झेप घेतली होती. यावेळी त्यांनी 44.10 फूटांची झेप घेतली होती. माहितीनुसार डेअर डेव्हिल्स च्या टीमने आतापर्यंत 28 वेळा विश्वविक्रम केला आहे.