मुंबई – कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसापासून बॉलीवूड कलाकारांनी वर्चस्व गाजवले आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर एकामागून एकसुपर स्टायलिश आणि सिझलिंग लुकसह बी-टाऊन कलाकार जगभरातील लोकांकडून प्रशंसा मिळवत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण , अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा कान्सच्या रेड कार्पेट लुकची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण
कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिकाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाचीची काळी आणि सोनेरी रंगाची साडी परिधान करून धुमाकूळ घातला. दीपिकाने सोनेरी हेडबँडसह फंकी हेअर बन हायलाइट केले. आयलायनर, लिप्स, झुंबर, अंगठ्या यासह तिचा लूक पूर्ण केला.
View this post on Instagram
अभिनेत्री उर्वशी रौतेला
बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री उर्वशीने यावेळी कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले आहे. उर्वशी रौतेला रेड कार्पेटवर ग्लॅमरस व्हाइट कलरच्या गाऊनमध्ये दिसली. उर्वशीला या लूकचे चाहत्यानी कौतुक केले आहे. पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर रफल गाऊनसह स्टायलिश इअर रिंग आणि ब्रेसलेट घातलेली उर्वशी एखाद्या देवदूतापेक्षा कमी दिसत नाहीये.
View this post on Instagram
अभिनेत्री तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया रेड कार्पेटवर ब्लॅक अँड व्हाइट डिझायनर बबल गाऊनमध्ये दिसली. तमन्नाच्या गाऊनच्या स्टायलिश नेकलाइन लुकमध्ये भर घातली. ब्लॅक अँड व्हाइट मोनोक्रोम ड्रेसमध्ये तमन्नाचा लूक खूपच आकर्षक आहे.
View this post on Instagram