खासदारकी जिंकण्यासाठी कार्यकर्ते उमेदवार देवाच्या दारी

नगर: निकाल आपल्या मनासारखा लागावा, यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक देवाच्या दारी जाऊ लागले आहेत. कार्यकर्ते देवांना अभिषेक घालण्याबरोबर पूजा-पाठ, उपवास करीत आहेत. पदाधिकाऱ्यांची ज्योतिषांकडेही गर्दी वाढू लागली आहे.

विरोधी उमेदवार लवकर न ठरल्याने भाजपसाठी ही निवडणूक पहिल्यांदा एकतर्फी वाटत होती. परंतू राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मतदारसंघ पिंजून कढल्याने निवडणूक चांगली रंगतदार बनली. नगर लोकसभेच्या इतिहास पहिल्यादांच इतकी रस्सीखेच झाल्याने निकालाचा अंदाज कोणालाच लागेना झाला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर दोन आठवडे कोण बाजी मारणार याची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र सुरु होती. त्यानंतर गेली काही दिवस चर्चा थांबली होती. मात्र निकाल जसजसा जवळ येऊ लागला तस-तसे चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

गुरुवारी, दि. 23 रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केवळ चार दिवस बाकी राहिल्याने सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

कोणबाजी मारणार याबाबत पैजा, सट्टे लागत आहेत. उमेदवारांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर दावे-प्रतिदावे केले जात आहे. अनेक स्लोगन टाकून एकमेकांची खिल्ली उडविली जात आहे. यावरुन काहींमध्ये जोरदार वादावादी सुरु आहे. येणारा उमेदवार फार लीड घेणार नाही. त्याचा विजय निसटता असेल, असा अंदाज राजकीय जाणकारांचा आहे.
उमेदवारांचीही धडधड वाढली असून त्यांनी जिंकण्यासाठी देवाच्या दारी जाण्यास सुरवात केली आहे. उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते पूजा-पाठ करु लागले आहेत. काहींनी देवांना नवस केले आहे.एका कार्यकर्त्याने काशी विश्‍वनाथाला अभिषेक घातला आहे. अनेकांनी अभिषेक घातले आहेत. उमेदवारांच्या जवळ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ज्योतिषाजवळील उठबस वाढली आहे.ज्योतिषाकडून अंदाज घेण्याचा प्रयत्न होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.