छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पिंपरी – माहेरहून 10 ते 15 लाख रुपये आणावेत, म्हणून पतीकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. ही घटना शनिवार दि. 18 मे रोजी पहाटेच्या सुमारास कसारवाडी येथील शास्त्रीनगर येथे घडली. सिंधू नामदेव शिंदे (वय-32) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील पंजाबराव दत्तात्रय देशमुख (वय-60 रा. तरोडा खु ता.जि. नांदेड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नामदेव नागुराव शिंदे (वय-60) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, फिर्यादी देशमुख यांची मुलगी सिंधु हिचे 2016 साली नामदेव शिंदे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर नामदेव हा सातत्याने सिंधू यांना माहेरहून पैसे आणावेत अशी मागणी करत होता. यावेळी सिंधू यांनी नकार दिल्यामुळे नामदेव तिचा शारीरिक व मानसिक छळ करु लागला. या त्रासाला कंटाळून सिंधू हिने शनिवारी गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.