Pakistan in CAA Viral Tweet| केंद्र सरकारने सोमवारी 11 मार्च रोजी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू केला आहे. CAA लागू झाल्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील गैर-मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. केवळ हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन निर्वासितांनाच भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे ट्वीट सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात ज्यामध्ये भारतानंतर आता CAA पाकिस्तानमध्ये देखील लागू होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान सरकारने देखील स्वतःचे CAA अधिसूचित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये भारतात अत्याचार झालेल्या भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानचे नागरिकत्व दिले जाईल, असे या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
Wow #ShehbazSharif, What a #Masterstroke.
Good news for those Indian Muslims who are not happy in India.
Now they can go #Pakistan easily. 😂🤣#CAARules #CAA #CitizenshipAmendmentAct #stockmarketcrash pic.twitter.com/FxE2jfm0DB— Aisha Dar (@AishaDar19) March 12, 2024
काय लिहिले शाहबाज शरीफ यांच्या ट्विटमध्ये?
“सीएएनंतर ज्या भारतीय मुस्लिमांना भारतात धोका वाटत आहे, त्यांनी कृपया पाकिस्तानात या. नवाज आणि शेहबाज शरीफ तुमची वाट पाहत आहेत, रोहिंग्या आणि बांगलादेशींना भारत घर नाही. कृपया परत या नाहीतर तुम्हाला भारतातून हाकलून दिले जाईल,” असे शाहबाज शरीफ यांचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल मेसेज खरा की खोटा?
शाहबाज शरीफ यांच्या ट्विटमागील सत्य जाणून घेण्यासाठी त्यांचे एक्स-प्रोफाइल तपासल्यानंतर CAA शी संबंधित कोणतेही ट्विट आढळले नाही. व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये कालची तारीख म्हणजे 11 मार्च दिसत आहे, तर शाहबाज शरीफ यांचे शेवटचे ट्विट 10 तारखेचे होते. शाहबाज शरीफ यांनी 11 मार्च रोजी त्यांच्या X खात्यावरून काहीही ट्विट केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटवरून केला जात असलेला दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल स्क्रीनशॉट हा बनावट असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा: