नागालॅंडमध्ये कडकडीत बंद

कोहिमा : नागा स्टूडंटस्‌ फेडरडशनने सुधारीत नागरिकत्व कायद्यताच्या विरोधात जाहीर केलेल्या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. शैक्षणिक संस्था बंद होत्या. त्यामुळे रस्त्यावर बाहने फारशी आलीच नाहीत. मात्र निदर्शकांनी परीक्षेला जाणारे विद्यार्थी, रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांना कामावर जाण्यापासून रोखले नाही. विवाहास जाणाऱ्यांना न अडवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.

केंद्र सरकारने हा कायदा करून सामान्य नागरिकांवर अन्याय केला आहे. आमी सुधारीत नागरिकत्व कायद्याला कधीही पाठींबा देणार नाही. ईशान्येकडील लोकांमध्ये या मुद्‌द्‌यावर फूट पाडून येथे राज्य करण्याचा हा केंद्र सरकारचा डाव आहे, असे एनएसएफचे उपाध्यक्ष दैवी यानो यांनी सांगितले. या विधेयकाला पाठींबा दिल्याबद्दल नागालॅंडमधील तीनही खासदारांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

या बंदच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे वृत्त पीटीआयने सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री दामापूर नागा स्टुडंटस्‌च्या वतीने बेकायदा स्थलांतरीतरांसाठी आयोजित कॅंडल मार्चमध्ये शेकडो नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.