मुंबई – बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय फसवणुकीचा बळी ठरला आहे. विवेकच्या जवळच्याच लोकांनी त्याच्यासोबत फसवणूक केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर विवेकने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. विवेक ओबेरॉयने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या व्यावसायिक भागीदारांनी त्याची फसवणूक केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात दीड कोटींची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयला त्याच्याच सहकाऱ्यांनी 1.5 कोटी रुपयांची फसवणूक केली. अभिनेत्याचे सीए देवेन बाफना यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, ४०९, ४१९ आणि ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास अंधेरी पूर्व पोलिस ठाण्यात सुरू आहे. आता आरोपींवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेमकं प्रकरण काय ?
विवेकच्या सीएने याबद्दल सांगितले की, 2017 मध्ये विवेक ओबेरॉयने पत्नी प्रियांका अल्वासोबत एक कंपनी सुरू केली. पण कंपनीला विशेष काही करता आले नाही. यानंतरच कंपनीने निर्णय घेतला की ते त्यात काही नवीन भागीदारांचाही समावेश करतील. यामध्ये एका चित्रपट निर्मात्याचाही समावेश होता. आम्ही मिळून ही कंपनी विसर्जित करून तिचे इव्हेंट बिझनेस कंपनीत रूपांतर करण्याचे मान्य केले. या प्रकल्पात विवेकने 1.55 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, परंतु अहवालांवर विश्वास ठेवला तर ही रक्कम भागीदाराने वैयक्तिक वापरासाठी वापरली.
दुसरीकडे, विवेक ओबेरॉयच्या कारकिर्दीकडे सांगायचे झाल्यास गेल्या काही वर्षांत फार कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो शेवटचा नरेंद्र मोदी बायोपिकमध्ये दिसला होता ज्यामध्ये त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. आता अभिनेता ओटीटीमध्ये पाय रोवण्याच्या तयारीत आहे. तो एका पोलीस वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. अभिनेत्याबद्दल बोलायचे झाले तर तो रोहित शेट्टीच्या आगामी वेब सीरिज इंडियन पोलिस फोर्समध्ये दिसणार आहे. ही मालिका प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.