मेलबर्न – करोनाचा धोका अद्याप संपुष्टात आलेला नसला तरी अनेक नियम व निर्बंध निश्चित करत ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना येत्या 6 जूनपासून प्रारंभ होत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला यासाठी तेथील सरकारने परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ओळखली जात असलेल्या डार्विन ऍण्ड डिस्ट्रिक टी-20 स्पर्धेला प्रारंभ होत आहे.
स्पर्धेबाबतचे नियम…..
1)चेंडूला लाळ व घाम लावण्यावर बंदी
2)हस्तांदोलन तसेच आलिंगनावर बंदी
3)ड्रेसिंगरुममध्येही सोशल डिस्टंन्सिगचे पालन
4)ड्रिंक्स ब्रेकमध्ये प्रत्येकाला पाण्याची स्वतंत्र बाटली
5)एकमेकांच्या वस्तूंना स्पर्श न करणे
भारताविरुद्धची मालिका एकाच मैदानावर……
ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ तिथेच मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सर्व सामने ऍडलेड या एकाच मैदानावर होणार आहेत. मैदान रिकामे ठेवून तसेच त्यापूर्वी भारतीय संघाला एका नव्याने बांधण्यात आलेल्या हॉटेलमध्ये 14 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे, त्यानंतरच मालिका खेळता येणार आहे.