औरंगाबादमध्ये मोबाईलच्या बॅटरीसोबत खेळताना स्फोट

औरंगाबाद – मोबाईल फोनसोबत खेळत असताना बॅटरीचा स्फोट झाल्याने दोन मुले जखमी झाल्याची घटना औरंगाबादच्या शिऊरमध्ये घडली आहे. या स्फोटात दोन्ही बालकांच्या हाताला गंभीर इजा झाली असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्णा रामेश्वर जाधव (वय 8) आणि कार्तिक रामेश्वर जाधव (5) अशी या मुलांची नावे आहेत.

ही घटना शिऊरमधील घोडके वस्तीत आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. कृष्णा आणि कार्तिक हे दोघे भाऊ मोबाईल फोनची बॅटरी बाहेर काढून तिच्यासोबत खेळत होते. मात्र त्याच वेळी बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात दोन्ही भावंडांच्या हाताला गंभीर इजा झाली.

याआधीही मोबाईल स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. मोबाईल फोन चार्जिंगला लावून फोनवर बोलल्यामुळे स्फोट झाल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. त्यातच आता मोबाईल फोनच्या बॅटरीच्या स्फोटाचा प्रकार समोर आला आहे. हा स्फोट कसा झाला, मोबाईल कोणत्या कंपनीचा होता हे अजून समजलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.