एसटी अपघातात बुलेट स्वार तरुण गंभीर रित्या जखमी

पेठ – आज सायंकाळच्या सुमारास कुरवंडी गावा जवळ एसटी आणि बुलेटचा अपघात होऊन यामध्ये बुलेटस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे. बुलेट घोडेगावच्या दिशेने जात असताना आणि एसटी मंचरच्या दिशेने येत असताना कुरवंडी जवळील तोत्रे विद्यालयाजवळ एसटी बस क्रमांक-MH 07 C7078 आणि बुलेट क्रमांक-MH 14 GV 7243 यांचा अपघात होऊन बुलेटस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे.

अपघातानंतर एस टी बस रस्त्याच्या बाजूला चरात जावून थांबली. सुदैवाने एसटी मध्ये कोण प्रवासी नसल्यामुळे आणि एसटी कर्मचारी सुखरूप आहे. बुलेट वरील तरुण वाकी ता. खेड येथील असून जावेद इनामदार असे तरूणाचे नाव आहे.

जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी तातडीने मंचर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी मंचर पोलीस कर्मचारी पोचले असून पुढील तपास करत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here