जयपूर – भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये कधी कोठे काय घडेल सांगता येत नाही आता राजस्थान मधील एका आगळावेगळा मंदिराची चर्चा सुरू झाली आहे या मंदिराचे नाव बुलेट बाबा मंदिर असे असून या मंदिरातील देव एक 350 सीसी क्षमतेची रॉयल एनफिल्ड बुलेट आहे या बुलेटलाच बुलेट बाबा असे नाव देण्यात आले आहे आर एन जे 7773 क्रमांकाची ही बुलेट या मंदिरात असून या बुलेटचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून बाईक स्वार या मंदिराकडे येत असतात.
जोधपूर पासून 53 किलोमीटर अंतरावरील छोटीला नावाच्या एका गावामध्ये ही हे बुलेटचे मंदिर आहे जेव्हा एखादा तरुण मोटरसायकलची खरेदी करतो तेव्हा ही नवी मोटरसायकल घेऊन तो या ठिकाणी दर्शनाला येतो किंवा अनेक वेळा विवाहित महिला सुद्धा आपल्या पतीला मोटरसायकल चालवताना कोणताही अपघात होऊ नये आणि त्याने सुरक्षित घरी परतावे याची प्रार्थना करण्यासाठी या मंदिरात दर्शनासाठी येत असतात मंदिराच्या बाहेर एक झाड असून त्या झाडाच्या खोडाला भाविक लाल धागा बांधून आपली मनीषा व्यक्त करतात स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 1988 मध्ये ओम सिंग राठोड नावाच्या एका व्यक्तीचा या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला होता अपघातानंतर त्याची बुलेट पोलिसांनी ताब्यात घेतली होती.
पण स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी ही बुलेट ताब्यात घेतल्यानंतर ती अचानक गायब झाली आणि पुन्हा एकदा ज्या ठिकाणी अपघात झाला होता तिथे दिसू लागली पोलीसांनी जितक्या वेळा ही बुलेट ताब्यात घेतली तितक्या वेळा पुन्हा ती बुलेट त्या अपघाताच्या ठिकाणी जाऊन उभी राहिली ही गोष्ट स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय झाला पोलिसांनी या कथेला दुजोरा दिला नसला तरी राजस्थानमधील या गावामध्ये आजही या मंदिरातील बुलेटचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते.