Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसचे समोरील टायर फुटल्याने बस अनियंत्रत होऊन उलटली. बस पलटी होऊन समोर असणाऱ्या दुभाजकाला थकल्याने डिझेल टाकीचा स्फोट झाला आणि बसला भीषण आग लागून २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट करत अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.ट्विटमध्ये त्यांनी,”महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने आपल्याला अत्यंत दु:ख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझी संवेदना आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे.” असे म्हटले आहे.
Deeply saddened by the devastating bus mishap in Buldhana, Maharashtra. My thoughts and prayers are with the families of those who lost their lives. May the injured recover soon. The local administration is providing all possible assistance to the affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 1, 2023
दरम्यान, सुरुवातीला या अपघातात २५ जण मृत्युमुखी झाल्याची माहिती समोर आली होती मात्र आता अपघातातील मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता, की बसमधील प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. सध्या पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.