धक्कादायक! पुरलेले मृतदेह उकरून मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके; बुलडाणा जिल्ह्यातील घटना

बुलडाणा – मोकाट कुत्र्यांनी पुरलेले मृतदेह उकरून लचके तोडल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत घडलीय. आपल्या आप्तांचे मृत्यूनंतरचे हाल पाहून जनभावना दुखावल्या जात आहेत. याप्रकरणी समाज पुढाऱ्यांनी समोर येऊन आवश्यक त्या उपाययोजना करून मृतदहाची अवहेलना थांबवण्याची मागणी केली जात आहे.

मलकापूरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत सर्वधर्मीय व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. अग्नीडाग देणे किंवा मृतदेहाचे दफनही येथे केले जाते. मात्र येथे दफन केलेल्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून होत आहे.

मलकापूर शहरात नदीकाठावर माता महाकाली वार्ड परिसरातील वैकुंठधाम स्मशानभूमीच्या नदी पात्राकडील संरक्षण भिंत पडलेली आहे. त्यामुळे पात्राच्या बाजूची जागा उघडी आहे. त्यामुळे तेथून काही कुत्रे येऊन पुरलेले मृतदेह उकरतात. मृतदेहाचे लचके तोडण्याच्या आणि मृतदेह फरपटत नेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मृतदेहांचे सांगाडे परिसरात पडलेले आढळून आल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, भंडाऱ्यातही कुत्र्यांकडून मृतदेहाची विटंबना होत असल्याची घटना समोर आलीय. येथे कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहांचे लचके तोडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. कुत्रे हे मास घेऊन गावात जात असल्याने भंडाऱ्यातील स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या गावात घबराटीचेही वातावरण निर्माण झालेय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.