‘सरकार बदलण्याचं माझ्यावर सोडा’, म्हणत फडणवीसांचा महाविकास आघाडीला थेट इशारा

पंढरपूर -राज्यातील महाविकास आघाडी सरकार हप्ते वसुलीच्या आरोपांमुळं अडचणीत सापडलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी चर्चा विरोधकांकडून करण्यात येत होता. तसेच काही नेत्यांकडून एवढेच दिवस हे सरकार टीकेल असंही बोलल जात होतं. आता खुद्द माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच सरकार बदलण्याचं माझ्यावर सोडून द्या, अस म्हणत मतदारांना साद घातली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

लोकं मला विचारतात एका मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काय फरक पडणार आहे ? याने काय सरकार बदलणार आहे का ? मी म्हणतो सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा. ते बदलू आपण. पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

सध्या पंढरपूर मतदार संघाची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. राज्यात करोना रुग्ण झपाट्याने वाढत असताना सत्ताधारी आणि विरोधीपक्षांकडून प्रचार सभांचा सपाटा सुरू आहे. सभांमध्ये करोना नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर राजकीय पक्षांच्या भूमिकांची चर्चा रंगली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.