मुंबई – मुंबईतील वांद्रे येथे बुधवारी 4 मजली इमारत कोसळली आहे. बेहराम नगरमध्ये हा अपघात झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे.
स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिमेकडील बेहराम नगर येथे दुपारी 3.50 च्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली किमान पाच जण अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. घटनास्थळी सहा रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि एक रेस्क्यू व्हॅन आहे.