मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्तचा संदेश विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाचला.