Budget 2021 : रस्ते व महामार्ग मंत्रालयासाठी ‘एवढ्या’ कोटींची तरतूद

Budget 2021 – केंद्रीय अर्थसंकल्पात रस्तेवाहतूकीच्या मुलभूत सुविधा वाढवण्यासाठी 1,18,101 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाची तरतूद केली आहे. यापैकी भांडवली खर्चासाठीची तरतूद 1,08,230 कोटी असून ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे.

3.3 लाख कोटी रुपयांचे 1300 किमी लांबीच्या रस्त्यांचे जाळे याआधीच 5.35 लाख कोटींच्या भारतमाला परियोजना प्रकल्पात मंजूर झाले आहेत, व त्यापैकी 3,800 किमी लांबीचे रस्ते बांधून तयार आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमन यांनी संसदेला दिली. मार्च 2022 पर्यंत आणखी 8,500 किमी रस्ते मंजूर होतील तसेच राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पातील 11,000 किमीचे महामार्ग पूर्ण होतील.

रस्ते वाहतूकीच्या मुलभूत सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने आर्थिक कॉरिडॉरच्या योजनेची आखणी होत आहे. केरळात राष्ट्रीय महामार्गासाठी 65,000 कोटींची गुंतवणूक, त्यामध्ये मुंबई ते कन्याकुमारी हा 600 किमी भागही समाविष्ट करण्यात आला आहे.

याशिवाय दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गासाठी 260 किमीचा राहिलेला भाग 31-3-2021 पूर्वी पूर्ण करणार. प्रगत वाहतूक व्यवस्थापन पद्धती अंतर्गत स्पीड रडार्स, बदलते संदेश फलक, झड सुविधा असलेल्या रिकवरी व्हॅन्स इत्यादी सर्व नव्या चार तसेच सहापदरी महामार्गांवर तैनात करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.