#Budget2021 : मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे सादर होणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज  (सोमवारी ) संसदेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्प “कधी नव्हे इतका चांगला’ असणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्या काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्प म्हंटल कि चटकन आपल्या डोळ्यांसमोर अर्थमंत्र्याच्या हातातील ब्रिफकेस येते होती. ब्रिटिश काळापासून या ब्रिफकेसची परंपरा चालत आली आहे. मात्र,  (२०१९) वर्षीपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढत लाल रंगाच्या चोपडीतून अर्थसंकल्प आणण्यास सुरवात केली होती. तर   यंदाचा अर्थसंकल्प पहिल्यांदाच पेपरलेस असणार आहे. अर्थमंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार यंदा ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेची सुरुवात अर्थमंत्रालयाने या निर्णयातून दाखवून देण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे सादर करण्यात येईल. Budget2021 ची सॉफ्ट कॉपी, ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. 

मोदी सरकारच्या काळात  अशा प्रकारे बदलत गेला अर्थ संकल्प सादर करण्याच्या  फॉर्मेट

2014: ब्लैक ब्रीफकेस
2015: ऑरेंज ब्रीफकेस
2016: रेड ब्रीफकेस
2017: ब्राउन ब्रीफकेस
2018: मरून ब्रीफकेस
2019: रेड ब्रीफकेस/ वहीखाता
2020: वहीखाता
2021: देशी टैब

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.