Budget 2024 : मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प 2.0 नवीन संसदेत आज म्हणजेच गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर केला आहे.
हा अंतरिम अर्थसंकल्प आहे, पण या मिनी बजेटमध्येही सरकारकडून अनेक मोठ्या घोषणांची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. या अर्थसंकल्पात महिला, युवक आणि शेतकरी यांच्या कल्याणकारी योजनांसाठी निधी देण्यात आला आहे.
अर्थमंत्र्यांनी 57 मिनिटांत देशाचा संपूर्ण आर्थिक लेखाजोखा जनतेसमोर मांडला. याच्या एक दिवस आधी म्हणजे 31 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेला संबोधित केले होते आणि त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीची गणना केली होती.
निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
– देशात 7 नवे IIT, 7 नवे IIM
– नवीन वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार
– दहा वर्षांत टैक्स कलेक्शन तीन पटीने वाढले
– ‘गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट आणि परफॉर्मन्स, अर्थात GDP वर समान भर देत आहे’
– वार्षिक 7 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही
– पायाभूत सुविधांवर 11 टक्के अधिक खर्च करणार
– दरमहा ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे
– येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार
– आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू
– 9 ते 14 वर्षांच्या मुलींना गर्भाशय कॅन्सरची लस दिली जाणार
– मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणार
– स्वावलंबनाला गती देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करणार
– 7 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही