Budget 2024 Date and Time: अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 गुरुवार, 1 फेब्रुवारी 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. अंतरिम अर्थसंकल्प ही सरकारसाठी निवडणुकीपूर्वी अल्प कालावधीसाठी तात्पुरती आर्थिक योजना आहे. लोकसभा निवडणुकीचा परिणाम उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावरही दिसून येईल. अर्थसंकल्पाचा सर्वसामान्यांवर सर्वाधिक परिणाम होतो कारण त्यांच्याशी संबंधित अनेक योजना आणि खर्च या अर्थसंकल्पात जाहीर केले जातात. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सादर केला जाणार आहे.
येथे पाहता येईल –
संसद टीव्ही आणि दूरदर्शन: हे दोन्ही चॅनेल बजेटचे थेट प्रसारण टेलिव्हिजनवर आणि त्यांच्या संबंधित YouTube चॅनेलवर करतील.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB): ते त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रिमिंग करतील.
न्यूज चॅनेल: अनेक वृत्तवाहिन्यांवर विशेष कव्हरेज आणि थेट प्रक्षेपण केले जाईल.
आर्थिक वेबसाइट्स: लाइव्ह फीड आणि अपडेट्स न्यूज वेबसाइट्सवर प्रदान केले जातील.
www.indiabudget.gov.in देखील अर्थसंकल्प पाहता येईल.
संसदेत केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे मोबाईल ॲपवर उपलब्ध होतील. www.indiabudget.gov.in या वेबसाईटवरून यूनियन बजट हे अॅप डाउनलोड करु शकता.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेला हा अंतरिम अर्थसंकल्प आहे, त्यामुळे मोठ्या धोरणात्मक घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. तथापि, निवडणुका लक्षात घेता, मतदारांना आकर्षित करण्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी घोषणांची अपेक्षा केली जाऊ शकते. महिला, शेतकरी आणि करदात्यांसाठी सरकार अर्थसंकल्पात घोषणा करू शकते.