बुद्धांची मूल्ये आणि तत्वे जागतिक समस्या सोडवण्यात सहाय्यभूत ठरतील : राष्ट्रपती

नवी दिल्ली – बुद्धांची मूल्ये आणि तत्वे जागतिक समस्या सोडवण्यात आणि जगाला एक अधिक उत्तम स्थान बनवण्यासाठी सहाय्यभूत ठरतील असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. आषाढ पौर्णिमा – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय बौध्द महासंघाद्वारे आयोजित वार्षिक कार्यक्रमाला राष्ट्रपती आज व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करत होते.

आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाची ध्येय, उद्दीष्टे प्रशंसनीय आहेत. सर्व बौध्द परंपरा आणि संघटनांना मानवतेची सेवा करण्यासाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध करण्याचे आयबीसीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले.

बौद्धतत्वज्ञावर 550 दशलक्षाहून अधिक अनुयायांचा दृढ विश्वास असल्याचे ते म्हणाले. बुद्धांनी दु:खाचा अंत करण्याचे आश्वासन दिले, सार्वत्रिक करुणा आणि अहिंसेवर त्यांनी भर दिला. सारनाथ इथे 2600 वर्षांपूर्वी याच दिवशी त्यांनी दिलेल्या प्रवचनात नंतर आजतागायत असंख्य लोकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे असे ते म्हणाले.

बुद्धांचे जीवन हे मानवतेसाठीचा अमूल्य संदेश असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. कोविड-19 ने प्रभावित या काळात जगाला करुणा, दयाळूपणा आणि निस्वार्थीपणाची आवश्‍यकता आहे असे ते म्हणाले. राष्ट्रपतींनी सकाळी राष्ट्रपती भवनाच्या उद्यानात बोधी वृक्षाचे रोप लावले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.