बीएसएफने पाडले पाकिस्तानचे टेहळणी ड्रोन

जम्मू – सीमा सुरक्षा दलाने आज जम्मू काश्‍मीरमधील कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानचे एक टेहळणी ड्रोन पाडले. पहाटे 5.10 च्या सुमारास बॉर्डर आऊट पोस्ट पानसरच्या आसपास पेट्रोलिंग ड्युटीवरच्या “बीएसएफ’च्या जवानांनी आकाशात हे ड्रोन उडताना पाहिले. “बीएसएफ’च्या जवानांनी सुमारे नऊ फैरी झाडल्या आणि आकाशात भारतीय हद्दीमध्ये सुमारे 250 मीटरवरचे हे ड्रोन पाडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

या ड्रोनमध्ये अत्याधुनिक रायफल आणि 7 ग्रेनेड बसवलेले होते. शस्त्रे आणि स्फोटके घेऊन जाणारे ड्रोन बीएसएफने पाडल्याची जम्मू भागातली ही पहिली घटना आहे. त्यामुळे जम्मू भागात हेक्‍साकॉप्टरद्वारे शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. होता. चिनी बनावटीच्या 17.5 किलो वजनाच्या ड्रोनमध्ये अमेरिकन बनावटीची एम-4 सेमी ऍटोमॅटिक कार्बाईन आणि 7 चिनी ग्रेनेड बसवलेले होते. गेल्या वर्षभरात पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे घेऊन ड्रोन येण्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान पाकिस्तानी रेंजर्सनी सीमेवरील हिरानगर क्षेत्रात बाबिया पोस्टवर सकाळी 8.50 वाजता गोळीबार केला. त्या गोळीबाराला आंतरराष्ट्रीय सीमेवरील “बीएसएफ’च्या जवानांनी प्रत्युत्तर दिले नाही. सीमेवरील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.