लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांच्या पाळीव कुत्र्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. ऋषी सुनक आणि त्यांचे कुटुंब सेंट्रल लंडनमधील हाइड पार्कमध्ये त्यांच्या कुत्र्याला गळ्याला पट्टा न बांधता फिरतांना दिसले.
Rishi Breaks Law Walking Dog With No Lead in Royal Parkhttps://t.co/dgjkp0z2kZ pic.twitter.com/hcgr39MHSi
— Guido Fawkes (@GuidoFawkes) March 14, 2023
या उद्यानात वन्यप्राण्यांना फिरण्यासाठी पट्टा बंधने आवश्यक असल्याची स्पष्ट सूचना लिहिल्या आहे. यापूर्वी लॉकडाऊनचे नियम मोडून सीट बेल्ट न लावता कार चालवल्याबद्दल सुनक यांना दंड ठोठावण्यात आला होता.
टिकटॉकवर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये, ऋषी सुनक यांचा पाळीव कुत्रा नोव्हा पट्टाशिवाय चालताना दिसत आहे. मेट्रोपॉलिटन पोलिसांना पाहून नोव्हा भुंकायला लागतो.
एका निवेदनात, पोलिसांनी मंगळवारी ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तीचा संदर्भ देत सांगितले की, “त्यावेळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने बोलून नियमांची आठवण करून दिली. त्यानंतर कुत्र्याला पट्ट्याने बांधण्यात आले.” ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्याने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.
यूकेचे पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा ऋषी सुनक आपल्या कुटुंबासह 10 डाऊनिंग स्ट्रीटवर गेले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्रा नोव्हा होता. ऋषी सुनक यांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी इंस्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला, जो सोशल मीडियावर भारतीयांमध्ये व्हायरल झाला आहे.