लंडन – ब्रिटिश एयरवेजच्या वैमानिकांनी जगभरात संप पुकारला आहे. यामुळे दोन दिवस ब्रिटिश एयरवेजची कोणतेही विमानाचे उड्डाण होणार नाही. वैमानिकांच्या संपामुळे तीन लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ब्रिटिश एअरवेजच्या इतिहासात पहिल्यांदाच वैमानिकांनी संप पुकारला आहे.
ब्रिटिश एअरवेजचे व्यवस्थापन आणि ४,३०० वैमानिकांमध्ये वेतनवाढीच्या मुद्द्यावरून नऊ महिन्यांपासून वाद सुरु आहेत. ब्रिटिश एयरलाइन पायलट एसोसिएशन (BALPA)ने ११.५ टक्केच्या वेतनवाढीचा विरोध दर्शविला असून वैमानिकांनी संप पुकारला आहे. यामुळे आज ब्रिटिश एअरवेजचे तब्बल ८५० विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत.
British Airways:We understand the frustration BALPA’s (British Airline Pilots’ Association) strike action has caused our customers. After months of trying to resolve pay dispute, we’re extremely sorry that it has come to this. We remain ready&willing to return to talks with BALPA https://t.co/Qbm5EjYFja pic.twitter.com/Ss8e6G9X29
— ANI (@ANI) September 9, 2019
ब्रिटिश एअरलाईन पायलट असोसिएशन आज आणि उद्यानंतर 27 सप्टेंबर रोजी संपावर असणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दोघांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, संप सुरूच राहिल्यास वैमानिक आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मोफत विमान सेवा बंद केली जाण्याची धमकी ब्रिटिश एअरवेजने दिली आहे. तसेच आम्ही कोणत्याही प्रकारे दिलगिरी व्यक्त करणार नसल्याचेही एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.