दोन डोस घेतल्यानंतरही ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना करोनाची लागण

लंडन – ब्रिटनचे आरोग्यमंत्री करोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही पुन्हा करोना पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी आरोग्य मंत्री साजिद जावेद यांच्याबरोबर एका बैठकीत बोरीस जॉन्सन आणि ऋषी सुनक सामील झाले होते. साजिद यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यात करोनाची हलकी लक्षणे दिसत आहेत.

जॉन्सन यांनी साजिद यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याने त्यांच्या संपर्कात येऊनही होम आयसोलेशमध्ये राहण्यास नकार दिला होता मात्र त्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी टीकेचा भडीमार केल्याने अखेर त्यांनी होमआयसोलेशन मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

लॉकडाऊनचे सर्व नियम ब्रिटन मधून हटविले गेले असले तरी ऍप आधारित टेस्ट अँड ट्रेस प्रणालीचा वापर केला जात आहे. अर्थात हे बंधनकारक नाही. या मध्ये हे ऍप मोबाईलवर असेल तर युजरला करोना संक्रमिताच्या संपर्कात आल्यास होम आयसोलेशची सूचना मिळते.

पंतप्रधान जॉन्सन एप्रिलमध्ये करोना संक्रमित झाले होते आणि त्यांना तीन दिवस आयसीयुमध्ये काढावे लागले होते. देशात बंधने हटली असली तरी नागरिकांना सावधानता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.