मुंबई – मुंबईतील घाटकोपर भागात काल कोसळलेल्या तीन मजली इमारतीच्या ढिगाऱ्यात सोमवारी 94 वर्षीय महिला आणि 56 वर्षांचा एक पुरुष मृतावस्थेत आढळून आले अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
घाटकोपर उपनगरातील राजावाडी कॉलनीतील चित्तरंजन नगर येथील इमारतीचा काही भाग रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास कोसळला. त्यातील तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली आणि तेथे अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सोमवारी हा ढिगारा हटवत असताना अग्निशमन दलाच्या जवानांना दोन जण मृतावस्थेत सापडले. अलका महादेव पलांडे आणि नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत.
रविवारी घडलेल्या या घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस, नागरी कर्मचारी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल च्या पथकाने बचाव कार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती.