Arvind Kejriwal -दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नव्याने समन्स बजावले. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी केजरीवाल यांना चौकशीसाठी २१ डिसेंबरला बोलावण्यात आले आहे.
संबंधित प्रकरणी ईडीने याआधी केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना २ नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, केजरीवाल त्यावेळी हजर राहिले नाहीत.
ईडीचे समन्स राजकीय हेतूने प्रेरित आणि कायद्याच्या कसोटीवर न टिकणारे असल्याची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली. आता ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावले आहे.