मुंबई – “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिल शाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा’, असे उपरोधिक ट्वीट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी काही दिवसांपूर्वी केलं आहे.
आव्हाड यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यभरात गदारोळ सुरू असतानाच त्यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे सांगितले आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी ट्वीट करून नव्या वादाला तोंड फोडले असून, हे वादग्रस्त विधान आता त्यांना भोवणार असल्याचं दिसत आहे.
रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.
दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा.
बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा
इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा#आवाज_बहुजनांचा_सन्मान_महाराष्ट्राचा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2023
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावर भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक चिथावणीखोर विधान केलं आहे. ‘जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ’ अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या कपिल दहेकर यांचं विधान सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, आपल्या विधानाचे पडसाद उमटल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपली बाजू मांडणारे ट्विट देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे.