नवी दिल्ली – यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. धमकी मिळाल्यानंतर लखनऊमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपत्कालीन नंबर (112) वर कॉल करून अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
भारतीय दंड संहिता (IPC) कलम 506, 507 आणि IT कायदा 66 अंतर्गत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धमकीचा फोन जाताच प्रशासन खडबडून जागे झाले. एका वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
Lucknow | Case registered under sections 506 & 507 IPC and 66 IT Act in PS Sushant Golf City against an unknown person after ‘Dial 112’ receives death threat for Uttar Pradesh CM Yogi Adityanath
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 25, 2023
पोलिसांनी सांगितले की, डायल ११२ वर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारणार आहे अशा आशयाचा फोन आला. ही धमकी मिळाल्यानंतर सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.