मुंबई – “अतरंगी रे’ चित्रपट नुकताच हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. साऊथचा सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूड स्टार्स सारा अली खान, बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. मात्र सध्या सोशलवर या चित्रपटाच्या कथेवरून वाद निर्माण झाला आहे.
चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादचा प्रचार केला जात आहे असल्याचे काही युजर्सचे म्हणणे आहे.सोशलवर याच मुद्यावरून ट्विटरवर ‘बॉयकॉट अतरंगी रे’ असा जोरदार ट्रेंड सुरु आहे. चित्रपटात अक्षय कुमारला मुस्लिम व्यक्तीच्या रुपात दाखवण्यात आले आहे.
ज्याचे नाव सज्जाद अली खान आहे. दुसरीकडे, सारा अली खान हिला हिंदू मुलीच्या रुपात दाखवण्यात आले आहे, तिचे नाव रिंकू रघुवंशी आहे. यावरून काही लोकांचे म्हणणे आहे की, चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादचा प्रचार केला जात आहे.सोशलवर काही युजर्सने संताप व्यक्त करत ‘लव्ह जिहाद’ थांबवायचा असेल तर सर्वप्रथम हिंदी चित्रपट निर्मितीला लगाम घालावा लागेल.’ असं मत व्यत केलं आहे.