गेल्या काही वर्षात आयसीसीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये केलेले बदल, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात आणि काही रोमांचक सामन्यांमुळे यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेट सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामत न्यूझीलंडने बाजी मारल्यानंतर. या स्पर्धेचा दुसरा हंगाम सुरु झाला आहे. यामध्ये आतापर्यंत झालेल्या काही सामन्यांमध्ये अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केलेली आहे. याच पार्श्वभूमिवर 2021 मध्ये सर्वोत्तम खेळ करणार्या खेळाडूंवच्या कामगिरीवर या लेखातून प्रकाश टाकणार आहोत.
1. जो रूट, इंग्लंड (1708 धवा)
इंग्लंडचा कर्णधार जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये या वर्षी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 15 सामन्यात 61.00 च्या सरासरीने 1708 धावा केल्या.
रुटने यावर्षी सहा शतके झळकावली आहेत, ज्यात वर्षातील पहिल्याच कसोटीत श्रीलंकेविरुद्धच्या सर्वाधिक 228 धावांचा समावेश आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये जेव्हा इंग्लंड भारतात आला तेव्हा रूटने पहिल्या कसोटीत 218 धावा करत संघाला 227 धावांनी विजय मिळवून दिला. तर भारताच्या इंग्लंड दौर्यातील चार सामन्यांमध्ये तीन शतकांसह 564 धावा केल्या होत्या.
2. रोहित शर्मा, भारत (906 धवा)
कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने झगडत असलेल्या रोहित शर्माने 2021 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 11 सामन्यांमध्ये 47.68 च्या सरासरीने 906 धावां केल्या आहेत. रोहितने या वर्षी दोन शतकेही झळकावली, ही दोन्ही शतके इंग्लंडविरुद्धची आहेत.
इंग्लंडच्या भारत दौर्यातील दुसर्या कसोटीत रोहितने पहिल्या डावात 231 चेंडूत 161 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 329 धावांची मजल मारली आणि 317 धावांनी सामना जिंकला.
भारताने जून-जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. यामध्ये रोहितने चौथ्या कसोटीतील दुसर्या डावात 127 धावांची खेळी करत भारताला 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. तसेच रोहित त्या दौर्यात भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने चार सामन्यांत 52.57 च्या सरासरीने 368 धावा केल्या होत्या.
3. दिमुथ करुणारत्ने, श्रीलंका (902 धावा)
श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेने 2021 मध्ये अवघ्या सात सामन्यांत 55.74 च्या सरासरीने 902 धावा केल्या आहेत. यावर्षी 500 हून अधिक धावा करणार्या सर्व सलामीवीरांमध्ये त्याची सरासरी सर्वाधिक आहे. त्याने यावर्षी दुसर्या क्रमांकाची सर्वाधिक चार शतके केली आहेत.
करुणारत्नेने यंदा बांगलादेश विरुद्ध घरच्या मैदानावर त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च 244 धावसंख्या नोंदवली. ही केवळ त्याची सर्वोच्च धावसंख्याच नाही तर 2014 नंतर श्रीलंकेच्या फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याही होती. या मालिकेतील दुसर्या सामन्यात त्याने धनंजया डी सिल्वासोबत चौथ्या विकेटसाठी 345 धावांची भागीदारी रचली. तर नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळपट्टीलर तब्बल 400 मिनिटे तळ ठोकत 300 चेंडूत 147 धावांची खेळी केली होती.