करिना कपूर-खान ही दुसऱ्यांदा आई होणार आहे. ही गुड न्यूज काही दिवसांपूर्वी तिने चाहत्यांशी शेअर केली होती. आता करिना कपूरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तिने आपल्याला मुलगी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.
मागच्यावेळी गर्भवती असताना करिना कपूरने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने याबाबत उल्लेख केला होता. करिनाने 2016मध्ये तैमूरला जन्म दिला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की, मला मुलगा आणि मुलगी हे दोन्ही एक समान आहेत.
करिना म्हणते की, कोणत्याही माता-पित्यांना आपल्या मुलांपेक्षा काहीच अधिक असूच शकत नाही. जे मुलींना समान दर्जा देत नाहीत, त्यांनी हे समजले पाहिजे की स्त्रीलाच दुसऱ्यास जन्म देण्याचा अधिकार आहे. करिना कपूर जेव्हा दुसऱ्यांदा गर्भवती राहिली, तेव्हापासून हा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहेत. जेव्हा तिने सांगितले की, तिला मुलगी असावी असे तिला वाटते.
दरम्यान, करिना कपूरला सध्या सातवा महिना सुरू असून ती सतत बेबी बंपसह आपले फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, करिना लवकरच “लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आमीर खान मुख्य भूमिका साकारत आहे.