पुणे – मालमत्तेचा वादातुन खुन करून त्यांच्या कुटूंबातील इतर जणांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. एकाचा अटकपूर्व, तर एकाचा नियमित जामीन फेटाळण्यात आला आहे. सत्र न्यायाधिश जी. पी. अग्रवाल यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.
रमजान उर्फ टिपू आदम पटेल याचा अटकपूर्व तर तसव्वुर उर्फ सलमान ताहीर शेख (वय-21, रा. दोघेही रा. बाबुराव नगर, शिरूर, जि. पुणे) याचा नियमित जामीन फेटळाण्यात आला आहे. याप्रकरणी अब्दुल जहीर मकबुल खान (वय-42, रा. शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. मकबुल रहीमान खान यांचा खून 14 जुन रोजी करण्यात आला होता. जफर उर्फ बिल्डर रहीम खान (वय-29), डॉ. मोहसिन नसिर पठाण यांच्याही अटक करण्यात आली आहे.
मालमत्तेच्या वादातून मकबुल यांचा खुन करण्यात आला होता. तसेच यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली होती. दोन्ही जामीन अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. रमजानने फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीला मारहाण केली आहे. त्याच्या विरोधात प्रथमदर्थी पुरावा असल्याचे दिसून येत आहे. तर, तसव्वुरचे नाव फिर्यादीत आहे. त्याचा गुन्ह्यात मोठा सहभाग आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे, यासाठी त्याचा जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद अॅड. प्रमोद बोंबटकर यांनी केली.