वाघळवाडी – नीरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
शरद गुळुंबे आणि राजेंद्र भोंडवे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार करंजेपूल वरून शरद गुळुंबे आणि राजेंद्र भोंडवे हे नीरेच्या दिशेने दुचाकी गाडीने (एमएच 42 एएम 8865) निघाले होते.
यावेळी नीरेच्याच दिशेने जाणारी मारुती इर्टिगा गाडी (एमएच 12 जेयू 3735) हिने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बारामती या ठिकाणी हलविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघात होताच चालक पसार झाला असून सहप्रवासी असलेल्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे हवालदार महेंद्र फणसे हे करीत आहेत.