Bollywood: बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या (Sunny deol) ‘गदर 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठा गल्ला जमवला. या चित्रपटाच्या यशानंतर त्याचा ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नुकतेच या चित्रपटाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. ‘बॉर्डर 2’ या सिनेमात अभिनेता आयुष्यमान खुरानाची (Ayushman Khurana) दमदार एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ (Border 2) हा सिनेमा 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. त्यानंतर या सिनेमाच्या सीक्वेलच्या चर्चा सुरू झाल्या. भूषण कुमार आणि जेपी दत्ता या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं जात आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, भूषण कुमार आणि जेपी दत्ता यांनी ‘बॉर्डर 2’ या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी अनुराग सिंह यांना विचारणा केली आहे. अनुराग सिंह यांनी ‘केसरी’ आणि ‘पंजाब 1984’ सारख्या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘बॉर्डर 2’ या सिनेमात आयुष्मान खुराना झळकणार असल्याचंही समोर आलं आहे.
View this post on Instagram
‘बॉर्डर’ या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर प्रदीर्घ काळानंतर 2024 मध्ये ‘बॉर्डर 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. 1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या सिनेमात सनी देओलसह सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, पूजा भट्ट आणि तब्बू हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धावर आधारित ‘बॉर्डर’ या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता बॉर्डर 2 मध्ये आयुष्मान खुराना, एमी विर्क आणि अहान शेट्टी सारखे कलाकार देखील दिसणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग 2024 च्या उत्तरार्धात सुरू होईल. यावेळीही त्याची कथा भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असेल.