अफगानिस्तानच्या राष्ट्रपतींच्या रॅली दरम्यान बॉम्बस्फोट

काबुल : अफगानिस्तानच्या परवाना प्रांतात अफगानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या रॅली दरम्यान आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. या आत्मघातकी हल्ल्यात आतापर्यत 24 जण जखमी झाले आहे तर 32 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना परवान रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गृहमंत्रालयाचे प्रवक्‍ते नसरत रहिमी यांनी या हल्ल्याविषयी माहिती दिली. हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते. यावेळी हल्लेखोरांनी रॅलीजवळच्या पोलिस ठाण्यात बॉम्ब लावला होता. दरम्यान, या हल्ल्यात राष्ट्रपती गनी यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.