मुंबई – मागील काही दिवसांपासून देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात रुग्ण वाढ अधिक आहे. चित्रपटसृष्टीत करोनाने शिरकाव केला असून अनेक कलाकारांना करोनाची लागण होत आहे.
मध्यंतरी अभिनेता रणबीर कपूर, मिलिंद सोमण, कार्तिक आर्यन, सोनू सूद, मनीष मल्होत्रा आणि आमिर खानला करोनाची लागण झाली होती. त्यातच आता अभिनेता ‘अर्जुन रामपाल’चा करोना अहवाल सुद्धा पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत करोनाने कहरच केला हे नक्की.
— arjun rampal (@rampalarjun) April 17, 2021
दरम्यान, स्वतः अर्जुन रामपाल ने आपला करोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याचं सांगितलं आहे. या संदर्भातील एक ट्विट देखील त्याने पोस्ट केले आहे. अर्जुन आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.. “माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत. मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे आणि आरोग्याची काळजी घेत, सर्व नियमांचे काटेकोर पालन करतोय. काही काळ तरी स्वत:ची काळजी घ्या, यामुळे फायदाच होईल. आपल्याला एकत्र येऊन कोरोनाशी लढा द्यावा लागेल.’ असं तो म्हणाला.