आता मिळणार कमी वजनाचे, पारदर्शक गॅस सिलिंडर्स

नेहमीच्या जड सिलिंडर्सपासून ग्राहकांना मुक्ती

नवी दिल्ली – आपल्या घरी येत असलेले छोटे किंवा मोठे सिलेंडर्स लाल किंवा निळ्या रंगात आपण नेहमीच पाहतो. तसेच हे लोखंडी सिलिंडर्सही खूप जड असतात, ज्यास उचलण्यासही खूप त्रास होतो. परंतु आता सिलिंडरमधील रंगाढंगात बदल होणार आहे. कारण आता हेवी सिलिंडरचा चेहरामोहराच बदलणार आहे.

 

 

एवढेच नव्हे तर हे सिलिंडर्सही पारदर्शक होणार आहेत, जेणेकरून आपणास सिलिंडर संपलाय की नाही तेसुद्धा लगेच समजणार आहे. इंडियन ऑईलने स्वतःच नव्या काळातील सिलिंडरबद्दल माहिती दिलीय आणि हा सिलिंडर कसा असेल हे आपण फोटोमध्ये देखील पाहू शकता. या सिलिंडरमध्ये काय खास असेल आणि हे सिलिंडर इतर सिलिंडर्सपेक्षा कसे वेगळे असणार आहेत, याचीही माहिती घ्या.

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आता इंडेनकडून कंपोझिट एलपीजी सिलिंडर देऊ केले आहेत. हे सिलिंडर सध्या दिल्ली आणि हैदराबादमध्ये उपलब्ध आहेत आणि या सिलिंडरसाठी तुम्ही जवळच्या सिलिंडर विक्रेत्याशी संपर्क साधू शकता. हे सिलिंडर लोखंडी सिलिंडरसारखे नाहीत, परंतु ते अतिशय स्टायलिश आहेत आणि दिसण्यातही आकर्षक आहेत. या सिलिंडरमधील ग्रिप हँडलपेक्षा डिझाईन बरेच वेगळे आहे.

या सिलिंडरची खास गोष्ट म्हणजे ते जुन्या सिलिंडरपेक्षा 50 टक्के कमी वजनाचे आहेत. त्याच वेळी लोकांना ते कमी वजनाने देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून आपण लहान सिलिंडर देखील खरेदी करू शकता. या सिलिंडरच्या पारदर्शक आकारामुळे आपण बाहेरून सिलिंडर पाहूनच अंदाज लावू शकता, आतमध्ये किती एलपीजी गॅस शिल्लक आहे, यासाठी तुम्हाला सिलिंडर उचलण्याची गरज भासणार नाही. तसेच सिलिंडर खरेदी करताना तुम्हाला सिलिंडरमध्ये किती गॅस आहे हेसुद्धा समजणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.