मुंबई – ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘दे दे प्यार दे’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे लव रंजन हे आजच्या काळात प्रेम आणि नाते संबंधांना धरून आपल्या अनोख्या अंदाजसाठी ओळखले जातात. तसेच, त्यांच्या चित्रपटांमध्ये एक गोष्ट कायम पाहायला मिळते ती म्हणजे सुंदर सेट्स आणि सुंदर आऊटडोर लोकेशन्स. अशातच, त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार’ 8 मार्च मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. रणबीर कपूर आणि श्रद्धाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातून अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत.
प्रेक्षकांनी श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या या चित्रपटाचे वर्णन एक मजेदार रोमँटिक ड्रामा चित्रपट म्हणून केले आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने केवळ अॅक्शन, ड्रामा, रोमान्स दाखवला नाही तर अनेक भावनिक दृश्ये चित्रित करून रणबीरने चाहत्यांना वेड लावले आहे.
दरम्यान, स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत त्याने श्रद्धाच्या बिकिनी लूकची खिल्ली उडवली असून, तिच्या बॉडी शेमिंगवर देखील टिप्पणी केल्याचं दिसून आलं आहे. चित्रपटात श्रद्धाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. आणि याच लूकवरून आता कमाल आर. खान याने अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला चांगलाच ट्रोल केलं आहे.
It’s my review of film #TuJhoothiMaiMakkaar! https://t.co/x9w7NHZtcu pic.twitter.com/1LjR6l9Ztk
— KRK (@kamaalrkhan) March 8, 2023
स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान आपल्या व्हिडिओत म्हणतो की, “श्रद्धाला सारखं बिकिनी लूकमध्ये दाखवलं गेलंय. लव रंजन साहेब, तुम्ही हे तरी सांगा की तुम्हाला नेमकं काय दाखवायचं आहे? ती ना दीपिका पदुकोण आहे, ना कतरिना कैफ आणि ना करीना कपूर.. मग तुम्हाला नेमकं दाखवायचं आहे तरी काय? जर त्या बिचाऱ्या मुलीकडे काहीच नाही, तर तुम्ही तिला सतत बिकिनी लूकमध्ये दाखवून काय सिद्ध करू इच्छिता?’ अशी टीका त्याने केली आहे.
तसेच तो पुढे म्हणतो, “लव रंजन साहेब सारखं त्याच्या चित्रपटाला पाण्यात घेऊन जातात. जिथे श्रद्धा कपूरला पाण्यात ढकललं जातं आणि रणबीर मात्र बाहेरच उभा असतो. कारण त्यांना माहित आहे की रणबीरला पाण्यात उतरवलं तर त्याचा विगसुद्धा (खोटे केस) उतरवला जाईल’. अशा शब्दांत त्याने दिग्दर्शकावर टीका केली.