सैफ अली खान आणि अमृता सिंगची कन्या सारा अली खान सध्या नवोदित नायिकांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. तिच्या चित्रपटामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटातील साराच्या भूमिकेची अनेकांनी प्रशंसा केली आहे. भूमिकेशिवाय फिटनेस साठी ती नेहमीच सोशलवर चर्चेत असते.
View this post on Instagram
बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी साराचे वजन फार जास्त होते. तिने योग्य आहार आणि तंत्रशुद्ध व्यायाम करुन आपलं 96 किलो वजनाचं शरीर कमी केलं. अन् हे वजन कमी करण्यासाठी केलेले व्यायाम आता ती आपल्या चाहत्यांसोबत देखील शेअर करताना दिसत आहे.
View this post on Instagram
सोशलवर तिने एक व्हिडियो सेंड करत याबाबत माहिती दिली आहे. सध्या हा व्हिडियो सोशलवर तुफान व्हायरल झाला झाला असून तिच्या या व्हिडियोला चाहत्यावर्गाकरून दाद दिली गेली आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये तिने विविध प्रकारचे व्यायाम दाखवले आहेत. यातील अनेक प्रकार तुम्ही घरच्या घरी देखील करु शकता. हे व्यायाम करुन तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात येईल असा विश्वास सारा अली खाननं व्यक्त केला आहे.
यापूर्वी देखील तिने अनेक वेळा मुलाखतींद्वारे वजन कमी करण्याचे विविध उपाय आपल्या चाहत्यांना सांगितले आहेत. दरम्यान तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओसाठी तिचे आभार मानले आहेत.