Rakul Preet Singh : मागील वर्षात परिणीती चोप्रा, कियारा अडवाणी, रणदीप हुड्डा यासारख्या अनेक कलाकार मंडळांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता 2024 या नव्या वर्षात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह संसार थाटणार असल्याची चर्चा रंगली आहे. बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत (Jackky Bhagnani) ती लग्न करणार आहे. रकुल प्रीत सिंहने 2021 मध्ये जॅकी भगनानीसोबतचं प्रेम जगजाहीर केलं. वाढदिवशी जॅकीसोबतचा फोटो शेअर करत तिने एक खास पोस्ट लिहिली होती.
त्यानंतर आता रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार असून गोव्यात त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्याप या जोडप्याने अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही. रकुल प्रीत सिंहचा बॉयफ्रेंड जॅकी हा निर्माता आहे. सध्या इतर सेलिब्रिटींप्रमाणे रकुल सध्या थायलँडमध्ये जॅकीसोबत एन्जॉय करत आहे. बॉयफ्रेंडचा वाढदिवस देखील ती परदेशात साजरा करणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या रकुल आज आघाडीची अभिनेत्री आहे. ‘गिल्ली’ या कन्नड सिनेमाच्या माध्यमातून तिने 2009 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘यारिया’ या सिनेमाच्या माध्यमातून तिने 2014 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. हिंदीसह तामिळ आणि तेलुगू सिनेमांत देखील तिने काम केले आहे.