मुंबई – बिग बॉस 9 (Bigg Boss 9) फेम कीथ सिक्वेरा (Keith Sequeira) आणि रोशेल राव (Rochelle Rao) यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हे दोघे आई- बाबा झाले असून त्यांच्या घरी एका चिमुकलेचे आगमन झाले आहे. लग्नाच्या पाच वर्षांनी रोशेल आणि किथ यांच्या घरी परी आली आहे. रोशेलने 1 ऑक्टोबरला मुलीला जन्म दिला आहे.
या जोडप्याने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘सर्वात मोठ्या आशीर्वादासाठी देवाकडे प्रार्थना करतो. मी या बाळासाठी प्रार्थना केली आणि मी जे मागितले ते परमेश्वराने मला दिले. आमच्या बाळाचा जन्म 1 ऑक्टोबर 2023 रोजी झाला. तुमच्या अतूट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद…’ या पोस्टसह तिने मुलीचा फोटोही शेअर केला आहे
या जोडप्याला नेहमीच मुलगी हवी होती. आपले पहिले बाळ मुलगी व्हावे, अशी या जोडप्याची इच्छा होती. यावेळी कीथ आणि रोशेल खूप आनंदी आणि उत्साहित आहेत. या क्षणाची हे जोडपे आतुरतेने वाट पाहत होते. या पोस्टनंतर सिने इंडस्ट्रीतील मित्र आणि चाहते या कपलचे अभिनंदन करत आहेत.
View this post on Instagram
कीथ आणि रोशेल यांची बिग बॉस सीझन 9 मध्ये झाली भेट
कीथ आणि रोशेल यांची भेट बिग बॉस सीझन 9 मध्ये झाली होती. या शोमध्येच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. त्यानंतर 4 मार्च 2018 रोजी या जोडप्याचे लग्न झाले. आता त्यांच्या आयुष्यात एका चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे.