नवी दिल्ली – 12वा दादासाहेब फाळके पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक चित्रपटांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर फरहान अख्तरला तुफान चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल ट्विटर पेजवरून फरहान अख्तरचा एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती जाहीर केली आहे, ज्यामध्ये अभिनेता फिल्म फेस्टिव्हल ज्युरींचे आभार मानत आहे. दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरींनी मला तुफानमधील माझ्या अभिनयासाठी दिलेल्या या अतुलनीय सन्मानाबद्दल धन्यवाद, असे फरहान ने म्हंटले आहे. फरहानने चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश मेहरा, लेखक, परेश रावल आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
Farhan Akhtar @FarOutAkhtar won Best Actor for Toofaan in @dadasahebfest 12th Dada Saheb Phalke Film Festival-22https://t.co/aAig8PI0ds#dadsahebphalkefilmfestival @excelmovies @ROMPPictures #dadasahebphalke #miniboxoffice #filmfestival #filmmarket #filmmaking #filmmakers pic.twitter.com/DT9BuZ9dTS
— Dada Saheb Phalke Film Festival (@dadasahebfest) May 1, 2022
2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्याने स्ट्रीट बॉक्सरची भूमिका केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक, हुसैन दलाल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती फरहान, राकेश आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला.