मुंबई – बॉलिवूडमध्ये सर्वच स्टार आपल्या फिटनेसला खुप महत्व देतात. ऑन स्क्रिन चांगलं दिसण्यासाठी अभिनेत्री तर तासंतास जिममध्ये घालवतात.दीपिका पदुकोण देखील त्यापैकीच एक आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील काम केल्यामुळे दीपिका आपल्या फिटनेसची चांगली काळजी घेते.तिच्या फिटनेस गोल्समुळे सामान्य लोकही प्रेरित होत आहेत.
दीपिका अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. दीपिका तिची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालासोबत वर्कआउट करताना दिसते यावरूनच ती नियमित व्यायाम करत असल्याचे समजते. जे की तिच्यासाठी खूप महत्वाचे आहे.त्याचप्रमाणे दीपिका योगा देखील करते. योगामुळॆ शरीरासह माईंड देखील फ्रेश राहतो.
दीपिका पदुकोणला जेवणाची खूप आवड आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो यासाठी साक्षीदार आहेत. ती मिठाईचीही शौकीन आहे. तिला आईस्क्रीम आणि चॉकलेट आवडतात. दीपिका पदुकोणच्या आहारतज्ञ पूजा माखिजा यांच्या मते, दीपिका एक स्मार्ट ईंटर आहे. काय खावे आणि काय नाही याबाबत ती अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेते.
View this post on Instagram
दीपिका पदुकोण भरपूर पाणी आणि इतर पेये घेते. एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, दीपिका दिवसातून 5 किंवा 6 वेळा थोडेसे खाणे पसंत करते. ती तिच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात लिंबाच्या रसाने करते. दीपिका तिचा नाश्ता कधीच चुकवत नसल्याचे देखील समोर आले आहे. या अशा सवयीनमुळे दीपिका निरोगी आणि एकदम फिट राहते.