बोलिवियाच्या राष्ट्राध्यक्षा जिनिन अंज करोना पॉझिटिव्ह

बोलिविया: बोलिवियाच्या राष्ट्राध्यक्षा जिनिन अंज यांना करोनाची बाधा झाली आहे. बोलिवियाच्या राष्ट्राध्यक्षा जिनिन अंज यांच्यासह प्रशासनातील तीन कॅबिनेट मंत्र्यांनी देखील करोनाची लागण झाली आहे. यात आरोग्यमंत्री ईडी रोका आणि अध्यक्षीय मंत्री येरको न्यूझ यांचाही समावेश आहे.

याबाबतची माहिती स्वतः अंज यांनीच ट्‌विटद्वारे दिली आहे. अंज यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या 14 दिवस घरातच क्‍वारंटाईन राहणार आहे. माझी प्रकृती स्थिर असल्याने मी घरातूनच सर्व कामे करणार आहे.

दरम्यान, करोना संक्रमणाच्या यादीत बोलिवियाचा जगात 40 वा क्रमांकावर आहे. बोलिवियामध्ये आतापर्यंत 44 हजार 113 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर 1638 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 हजार 354 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 29 हजार 121 रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामधील 71 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.