Bobby Deol : बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारी (Neelam Kothari) ही 90 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. नीलमने 1984 मध्ये ‘जवानी’ चित्रपटातून पदार्पण केले आणि तिच्या पहिल्या चित्रपटातूनच तिने तिचे सौंदर्य आणि अभिनय कौशल्य मोठ्या पडद्यावर पसरवले.
नीलमच्या या आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन धर्मेंद्र यांचा मुलगा आणि बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) तिच्यावर खूप प्रभावित झाला आणि असे म्हटले जाते की दोघेही खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते,
पण असे काय झाले की नीलम आणि बॉबीचे नाते टिकले नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला. नीलम कोठारी यांनीच याबाबत खुलासा केला आहे. नीलम काय म्हणाली जाणून घ्या…
नीलम आणि बॉबीचे नाते…
बॉबी देओल आणि नीलम कोठारी 90 च्या दशकात जवळपास 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. बॉबी देओलचे पूजा भट्टसोबत अफेअर होते, त्यामुळेच नीलम आणि त्यांचे ब्रेकअप झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे,
मात्र नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान नीलमने पूजा भट्ट किंवा इतर कोणत्याही मुलीच्या येण्यामुळे आमचे ब्रेकअप झाले नसल्याचे सांगितलं.
कुटुंबाच्या आणि आमच्या संमतीने आम्ही दोघे वेगळो झालो असं ती म्हणाली. मला फक्त एका स्टारची पत्नी म्हणून माझी कारकीर्द संपवायची नव्हती.
गोविंदासोबत नीलमचे अफेअर चर्चेत होते
बॉबी देओलच्या अफेअरचीच नाही तर गोविंदा आणि नीलमच्या अफेअरचीही बॉलिवूड वर्तुळात चर्चा होती. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि लोकांना त्यांची केमिस्ट्री फॅन्सला खूप आवडली.
मात्र, त्यावेळी गोविंदा सुनीताशी एंगेज झाला होता आणि नीलमसोबतच्या जवळीकतेमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात भांडणे होऊ लागली, त्यामुळे नीलम आणि गोविंदाचे नातेही तुटले.